यवतमाळ - शहरवासियांसाठी एक आनंददायी घटना घडली. 21 दिवस विलगीकरण कक्षात उपचार घेऊन निगेटिव्ह झाल्यानंतर 38 जणांना घरी सोडण्यात आले. यावेळी त्यांच्या चेहर्यावर एक वेगळ्याच प्रकारचे हास्य फुलले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयातून त्यांना निरोप देताना त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या रुग्णवाहिकेतून त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी 35 रुग्णांच्या हातावरती होम क्वारंनटाईनचे शिक्के मारून त्यांना 14 दिवस घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर 3 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. यात शहरातील इंदिरानगर, गुलमोहर सोसायटी, मेमन कॉलनी यासह लहान-मोठ्या 35 सोसायटीतील रुग्णांचा समावेश आहे.