यवतमाळ- बोरी बुद्रुक येथील एका शेतकऱ्याच्या गोडाऊनमधून चोरट्यांनी ३६ पोते सोयाबीन चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारव्हा पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या बोरी बुद्रुक येथील शेतकरी अश्विन देशपांडे यांच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये सोयाबीन साठवून ठेवलेली होती. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास गोडाऊनचे कुलूप तोडून गोडाऊनमधील ३६ पोते सोयाबीन चोरून चारचाकी वाहनातून पळ काढला. सकाळी गोडाऊन फोडून असल्याचे देशपांडे यांच्या निदर्शनास आले. त्यानी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले. त्यात हातात रॉड घेऊन चोरटे चोरी करत असतानाचे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते.