यवतमाळ -औरंगाबादच्या रेडीको डिसलेरी कंपनीमधून निघालेला दारूसाठा नांदेडला न जाता यवतमाळ-धामणगाव मार्गावर शहर पोलिसांनी पकडला जप्त केला. यात 500 पेट्या विदेशी दारूचा माल आणि 10 लांखांचा ट्रॅक असा एकूण 46 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री 11च्या सुमारास करण्यात आली.
संशयास्पदरित्या जाणारा 36 लाखांचा दारूसाठा जप्त; यवतमाळ शहर पोलीस ठाण्याची कारवाई - Yavatmal crime news
500 पेट्या विदेशी दारूचा माल आणि 10 लांखांचा ट्रॅक असा एकूण 46 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री 11च्या सुमारास करण्यात आली.

liquor
यवतमाळ मार्गाने आल्याने...
ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लिनर ट्रक सोडून फरार झाल्याने संशयास्पद माल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनजन सायरे यांनी दिली. यावेळी उत्पादन शुल्क विभागाने ठरवून दिलेल्या रूटने न जाता यवतमाळ मार्गाने आल्याने हा दारू साठा दारूबंदी असलेल्या चंद्रपूर वा वर्धा जिल्ह्यात जात असल्याचा संशय आल्याने हा साठा जप्त करण्यात आला. पुढील कारवाई यवतमाळ शहर पोलीस ठाणे करीत आहे.