यवतमाळ- बर्ड फ्लूची यवतमाळ तालुक्यात धास्ती निर्माण झाली आहे. रातचांदना येथील शेतकऱ्याच्या पोल्ट्रीफार्ममधील सोमवारी रात्री (18 जानेवारी) 2 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. तर आज दुपारच्या सुमारास 2 हजार 700 कोंबड्यांचा 3 हजार 700 कोंबड्यांचा मृत्यू झाला. मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
यवतामाळ तालुक्यामधील कोंबड्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळाकडे धाव घेतली. मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविले. या परिसरात दहा किलोमीटर अंतरापर्यंत अलर्ट जारी करण्यात आला. या घटनेमुळे पोल्ट्रीफार्म व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण झाली.
हेही वाचा-बर्ड फ्लूचे संकट: मुंबईत २४ तासांत २१४ पक्ष्यांचा मृत्यू
आधी कोरोना आता बर्डफ्लूमुळे आर्थिक संकटरातचांदना येथील महंमद अमीन सोळंकी हे गेल्या 10 ते 12 वर्षांपासून शेती करत आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी पोल्ट्रीचा व्यवसाय सुरु केला. यावर्षी पोल्ट्री फार्ममध्ये 6, 500 कोंबड्या होत्या. त्यांना चांगली आर्थिक आवक होती. अचानक आलेल्या अज्ञात आजाराने 3 हजार 700 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती पोल्ट्री व्यावसायिक महम्मद अमीन सोळंकी यांनी दिली. कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली.