यवतमाळ - जिल्ह्यात मागील चोवीस तासामध्ये 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून नव्याने 176 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. तर 66 जणांनी कोणावर मात केली आहे. आज मृत झालेल्या तीन जणांमध्ये यवतमाळ शहरातील 66 वर्षीय महिला, तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, वणी मधील 54 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात तिघांचा मृत्यू; नव्याने 176 पॉझिटिव्ह रुग्णांची भर, 66 जणांना डिस्चार्ज - yavatmal corona latest news
राज्यात कोरोना लॉकडाऊन उठविल्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच कोरोनाबाधितांची मृत्यू संख्याही वाढत आहे. याचप्रमाणे यवतमाळमध्ये मागील चौवीस तासात विविध तालुक्यातील एकूण १७६ जण बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे.
![जिल्ह्यात तिघांचा मृत्यू; नव्याने 176 पॉझिटिव्ह रुग्णांची भर, 66 जणांना डिस्चार्ज 3 corona patient died and new 176 positive found in yavatmal district](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8864681-301-8864681-1600529819193.jpg)
आज पॉझिटिव्ह आलेल्या 176 जणांमध्ये 110 पुरुष आणि 66 महिला यांचा समावेश आहे. यात आर्नी शहरातील सात पुरुष व चार महिला, बाभुळगाव शहरातील एक पुरुष व तीन महिला, दिग्रस शहरातील दोन पुरुष व तीन महिला, कळंब शहरातील चार पुरुष व चार महिला, महागाव शहरातील दोन पुरुष, नेर शहरातील आठ पुरुष व तीन महिला, पांढरकवडा शहरातील 13 पुरुष व आठ महिला, पुसद शहरातील 15 पुरुष व पाच महिला, उमरखेड शहरातील सात पुरुष व तीन महिला, वणी शहरातील 12 पुरुष व 19 महिला, यवतमाळ शहरातील 39 पुरुष व 15 महिलांचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये 1406 अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह भरती आहे. होम आयसोलेसशन 326 जण तर आयसोलेशन वॉर्डात 283 जण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6932 झाली. तर यातील 5005 जण बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत 195 मृत्यू झाले आहेत.