महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ: जिल्ह्यात २४ तासात ५ रुग्णांचा मृत्यू, २५८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद - corona patients death yavatmal

गेल्या २४ तासात वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर, तसेच कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले १७३ नागरिक 'निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह' झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून २५८ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोना यवतमाळ
कोरोना यवतमाळ

By

Published : Sep 13, 2020, 9:25 PM IST

यवतमाळ- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्यूचा आकडा वाढत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत ४ हजारांवर कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या २४ तासात वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर, तसेच कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले १७३ नागरिक 'निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह' झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर, जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून २५८ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

मृत्यू झालेल्या ५ जणांमध्ये ३ पुरुष व २ महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील ७५ वर्षीय पुरुष व ४९ वर्षीय महिला, पांढरकवडा शहरातील ४७ वर्षीय पुरुष, वणी शहरातील ९० वर्षीय महिला आणि दारव्हा शहरातील २४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या २५८ जणांमध्ये १६० पुरुष व ९८ महिला आहेत. यात आर्णी शहरातील १५ पुरुष व ५ महिला, आर्णी तालुक्यातील १ महिला, दारव्हा शहरातील ७ पुरुष व ४ महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, दिग्रस शहरातील २ पुरुष व २ महिला, घाटंजी शहरातील ४ पुरुष व एक महिला, घाटंजी तालुक्यातील एक पुरुष, कळंब शहरातील २ पुरुष व २ महिला, कळंब तालुक्यातील ४ पुरुष, महागाव शहरातील २३ पुरुष व १४ महिला, महागाव तालुक्यातील एक महिला, नेर शहरातील एक पुरुष, नेर तालुक्यातील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील १५ पुरुष व ५ महिलांचा समावेश आहे.

त्याचबरोबर, पुसद शहरातील २० पुरुष व १४ महिला, राळेगाव शहरातील एक पुरुष व ८ महिला, उमरखेड शहरातील ५ पुरुष व २ महिला, वणी शहरातील २० पुरुष व २० महिला, वणी तालुक्यातील एक पुरुष, यवतमाळ शहरातील २६ पुरुष व १४ महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष, झरी शहरातील ८ पुरुष व ५ महिला. तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणचे २ पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २७६ अ‌ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये २७४ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ७०९ झाली आहे. यापैकी ४ हजार ८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर, जिल्ह्यात १५० मृत्यूंची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २९३ जण भरती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ६३ हजार ३९ नमुने पाठवले असून यापैकी ५९ हजार ८१२ प्राप्त, तर ३ हजार २२७ अप्राप्त आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ७०९ झाली आहे. डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने यापैकी तब्बल ४ हजार ८ रुग्ण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७०.२० टक्के आहे.

हेही वाचा-यवतमाळ : स्त्री रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी लवकरच 300 खाटांची सुविधा होणार उपलब्ध

ABOUT THE AUTHOR

...view details