महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर यवतमाळात पावसाची हजेरी; मात्र, जिल्हा अद्यापही तहानलेलाच - नवरगाव प्रकल्प

गेल्या महिन्याभरापासून पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता गेल्या ३ दिवसांपासून यवतमाळ पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसाचा जोर कायम असला तरी जिल्ह्यातील पाणीसाठे अद्यापही तहानलेलेच आहेत.

महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर यवतमाळात पावसाची हजेरी; मात्र, जिल्हा अद्यापही तहानलेलाच

By

Published : Aug 1, 2019, 7:42 PM IST

यवतमाळ -गेल्या १२ तासांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रकल्पात जळपातळीत वाढ झालेली नाही. निळोणा प्रकल्पाचा साठा २० टक्क्यावर पोहोचलेला आहे, तर पाटबंधारे विभागाच्या ११३ प्रकल्पांमध्ये केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर यवतमाळात पावसाची हजेरी; मात्र, जिल्हा अद्यापही तहानलेलाच

गेल्या महिन्याभरापासून पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता गेल्या ३ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसाचा जोर कायम असला तरी जिल्ह्यातील पाणीसाठे अद्यापही तहानलेलेच आहेत.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात सर्व प्रकल्पांत 69.56 टक्के जलसाठा होता. यंदा आतापर्यंत केवळ 18.78 टक्के पाणी आहे. गेल्या वर्षी तीन मोठ्या प्रकल्पांत 53.37 टक्के जलसाठा होता. सध्या 19.46 टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पात सध्या 16.74 टक्के जलसाठा आहे. मात्र, गेल्या वर्षी हा जलसाठा 93.48 टक्के होता.

निळोण्यात फक्त 20 टक्के पाणी -

यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणार्‍या निळोणा व चापडोह प्रकल्पांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. प्रकल्पात जलसाठा नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने इमरजन्सी पंपांद्वारे पाणी उचल सुरू केली होती. पाणी नसल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता होती. पावसाने जोर पकडल्याने प्रकल्पातील जलसाठा 20 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जलसाठा वाढल्याने प्राधिकरणाने इमरजन्सी पंप बंद केले आहेत. चापडोह प्रकल्पातील जलसाठा 32 टक्क्यांवर पोहोचला आहे.

  • जिल्ह्यातील प्रकल्पजलसाठा
  1. पूस - 20.19
  2. अरुणावती - 9.51
  3. बेंबळा - 27.09
  4. अडाण - 4.61
  5. नवरगाव - 39.26
  6. गोकी - 20.96
  7. वाघाडी - 11.93
  8. सायखेडा - 28.29
  9. अधर पूस - 20.58
  10. बोरगाव - 13.92

ABOUT THE AUTHOR

...view details