यवतमाळ -आदिवासी समाजासाठी पुसदमधील वडते मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णांसाठी नि:शुल्क 20 बेडचे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे. भारतीय जनता पक्ष अनुसूचित जमातीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या प्रयत्नातून हे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे.
24 तास वैद्यकीय सेवा -
पहिल्या व दुसर्या लाटेनंतर कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अनुषंगाने तालुक्यातील आदिवासी समाजातील रुग्णांकरिता या कोविड आयसोलेशन सेंटरमध्ये निःशुल्क 20 बेड सर्व सुविधांसह उभारण्यात आले आहेत. तसेच या आयसोलेशन सेंटरमध्ये 24 तास वैद्यकीय सेवा, दोन वेळ पौष्टिक आहारयुक्त जेवण व नाश्ता, डॉक्टरांचे मार्गदर्शन, मनोरंजनासाठी टी.व्ही. या सुविधांची सोय करण्यात आली आहे.