महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये आणखी 2 जण कोरोनाबाधितांची नोंद, एकूण आकडा 84 वर - यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

वैद्यकीय महाविद्यालयाला आज मिळालेल्या 23 अहवालांमध्ये 2 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 21 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अ‌ॅक्टीव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 84 झाली आहे. नव्याने सापडलेले दोन्ही पॉझिटिव्ह रूग्ण हे नेर येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य आहेत.

Corona positive
कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : May 8, 2020, 12:50 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. वैद्यकीय महाविद्यालयाला आज मिळालेल्या 23 अहवालांमध्ये 2 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 21 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अ‌ॅक्टीव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 84 झाली आहे.

नव्याने सापडलेले दोन्ही पॉझिटिव्ह रूग्ण हे नेर येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य आहेत. आज वैद्यकीय महाविद्यालयाने 57 नमुने तपासणीसाठी पाठवले असून नेर येथील आणखी काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घरातच रहावे, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details