यवतमाळ : नागपूर-यवतमाळ महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या बारजवळ १८ किलो गांजा, दुचाकी व मोबाईल असा एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखाने काल रात्री ही कारवाई केली.
पेट्रोलिंग करताना मिळाली होती माहिती -
18 किलो गांजासह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघे एलसीबीच्या ताब्यात - यवतमाळ गांजा जप्त न्यूज
यवतमाळमधील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी एलसीबी पथकाकडून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची कारवाई करण्यात येत आहे. यादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने गांजाची वाहतूक करणाऱ्याना दोघांना अटक केली आहे.
उड्डाण पुलाजवळ असलेल्या बारच्या बाहेर गांजाची तस्करी होणार आहे, अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून साहील शिरभाते (वय 23) आणि दिनेश रोहणे ( वय 26, दोघेही रा. कळंब जि. यवतमाळ) या दोघांना अटक करण्यात आली.
एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल -
एलसीबी पथक कळंबकडे पेट्रोलिंग करत असताना नागपूर-यवतमाळ महामार्गावर उड्डाणपुलाजवळ दोन तरूण दुचाकीवर काही तरी घेवून जात असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांना आढळले. त्या दोन्ही दुचाकीस्वारांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, दुचाकीवरील एका पोत्यात 18 किलो गांजा आढळला. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून गांजा, एक दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण चार लाख 64 हजार 160 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.