यवतमाळ -वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझिटिव्ह आलेले १७ जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ३६ वरून १९ वर आली होती. मात्र, शुक्रवारी ५ जण नव्याने पॉझिटिव्ह आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण २४ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
यवतमाळमध्ये शुक्रवारी १७ रुग्ण कोरोनामुक्त; जिल्ह्यातील मृत्यूदर १ टक्क्यांपेक्षाही कमी - यवतमाळ जिल्हा कोरोना अपडेट
आतापर्यंत उपचारामुळे बरे होऊन घरी गेलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १४१ वर पोहचली आहे. तसेच जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत आयसोलेशन विभागात २४ पॉझिटिव्ह रुग्णांसह एकूण ३० जण भरती आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी ६ अहवाल प्रयोगशाळेत पाठविले. सुरूवातीपासून आतापर्यंत एकूण २६१० नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी २५९८ अहवाल प्राप्त झाले असून १२ अहवाल प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १६७ वर गेली आहे. यापैकी सद्यस्थितीत आयसोलेशन विभागात २४ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत उपचारामुळे बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या १४१ वर पोहचली आहे. तसेच जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे.