यवतमाळ - कोरोना काळात कोरोना योद्ध्यांनी जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम केले. मात्र जिल्हा रुग्णालयांमध्ये 160 कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन दिले नाही. आता या कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी कामावरून तडकाफडकी कमी केले आहे. या अन्यायाविरोधात कर्मचाऱ्यांनी मनसेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे दाद मागितली.
जिल्हा रुग्णालयातील 160 कंत्राटी कर्मचारी कामावरून कमी, दोन महिन्यांचे वेतनही रखडले; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली दाद - district hospital of yavatmal news
कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम केलेल्या 160 कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन दिले नाही. आतातर या कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयाने कामावरून तडकाफडकी कमी करण्यात आले आहे.
![जिल्हा रुग्णालयातील 160 कंत्राटी कर्मचारी कामावरून कमी, दोन महिन्यांचे वेतनही रखडले; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली दाद yavatmal district hospital news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9655452-741-9655452-1606275867370.jpg)
यवतमाळ जिल्हा रुग्णालय बातमी
160 कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन नाही
जिल्हा रुग्णालयांमध्ये जे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यांना पूर्ण वेतन दिले जाते. मात्र, ते कुठलेही काम करत नसल्याचा आरोप यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. आम्ही दिवस-रात्र सेवा दिली. मात्र, आम्हाला कामावरून कमी केले. त्यामुळे या कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला कामावर घेण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
Last Updated : Nov 25, 2020, 8:47 PM IST