महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ज्वारीचे फुटवे खाल्ल्याने 16 गाईंचा मृत्यू; 44 गाईंवर उपचार सुरू - 16 गाईंचा मृत्यू

बाभूळगाव तालुक्यातील नांदेसावंगी येथील लक्ष्मणराव कांबडी यांनी आपल्या शेतातील ज्वारी आठ दिवसापूर्वी काढली होती. या ज्वारीचे फुटवे जवळपास 60 गाईंनी खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली.

ज्वारीचे फुटवे खाल्ल्याने 16 गाईंचा मृत्यू; 44 गाईंवर उपचार सुरू

By

Published : May 22, 2019, 9:48 AM IST

यवतमाळ- बाभूळगाव तालुक्यातील नांदेसावंगी येथे ज्वारीचे फुटवे खाल्ल्याने 60 गाईंना विषबाधा झाली. यातील 16 गाईचा मृत्यू झाला. तसेच 44 गाईंवर सध्या गावात पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करत असून काही गाईंची प्रकृती चिंताजनक आहे.

ज्वारीचे फुटवे खाल्ल्याने 16 गाईंचा मृत्यू; 44 गाईंवर उपचार सुरू

बाभूळगाव तालुक्यातील नांदेसावंगी येथील लक्ष्मणराव कांबडी यांनी आपल्या शेतातील ज्वारी आठ दिवसापूर्वी काढली होती. या ज्वारीचे फुटवे जवळपास 60 गाईंनी खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली. हे ज्वारीचे फुटवे खाल्ल्यानंतर अर्ध्या तासातच गाईंना गुंगी येऊन पटापट शेतामध्ये पडण्यास सुरुवात झाली. अशातच 16 गाईंचा शेतामध्ये मृत्यू झाला. ही बाब गुराख्याच्या लक्षात येताच त्यांनी गावकऱयांना माहिती दिली. गावकऱ्यांनी लगेच पंचायत समितीमधील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज शेंदुरकर, डॉ. ओंकार यांच्यासह याना शेतामध्ये बोलावण्यात आले. यावेळी 44 गाईंना इंजेक्शन आणि सलाईन लावून उपचार सुरू केले. यातील काही गाईंची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे.

ज्वारीच्या 10 इंच पर्यंतच्या फुटव्यामध्ये हायड्रोसायनिक हे विष निर्माण होत असल्याने हे खाल्ल्यास विषबाधा होते. उन्हाळ्याच्या दिवसात हिरव्या चाऱ्याची कमतरता असते. अशातच ज्वारीचे फुटवे हे हिरवे असल्याने जनावरे याठिकाणी खाण्यास जातात. त्यामुळे गुराख्याने अशा शेतामध्ये आपली जनावरे चारा खाण्यास नेऊ नये असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजीव खेरडे यांनी केले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details