यवतमाळ - वणी तालुक्यातील रासा येथे पोलिसांनी धाड टाकत धडक कारवाई केली आहे. या कारवाईत १४ लाख ५५ हजार ६०० रूपयाचा सुगंधीत तंबाखू सहमुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे धाड
यवतमाळ - वणी तालुक्यातील रासा येथे पोलिसांनी धाड टाकत धडक कारवाई केली आहे. या कारवाईत १४ लाख ५५ हजार ६०० रूपयाचा सुगंधीत तंबाखू सहमुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे धाड
वणी पोलिसांनी गोपीनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे. तालुक्यातील रासा येथे प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची विक्री करण्यात येत असून एका घरात ही तंबाखू साठवणे सुरु आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी रासा येथे जावून धाड टाकली असता दिपक खाडे (२७, वाहन चालक रा. रासा ता.वणी) व त्याच्या सोबत दिपक कवडू चावला (४०, रा. महादेव नगरी वणी) हे आपल्या घरी टाटा एस वाहन (एमएच२९ एटी ०८८५) ने तंबाखू आणत विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेला मजाच्या तंबाखूचा माल उतरवत आहे. यावरूनच पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
घर झडतीत सापडला मुद्देमाल
घरझडती घेतली असता पांढरे रंगाच्या पिशवी असलेल्या गोणीत एकूण २०० नग मजा १०८ हुक्का शिशा तंबाखु असे लिहिलेले ५० ग्रॅम वजन असलेले झेन टोब्याको कंपनीचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचे डब्बे किंमत प्रती डब्बा १९१ रुपये असे ४ पिशवीमध्ये एकूण ८०० नग एकूण किंमत १ लाख ५२ हजार ८०० रुपये , पांढरे रंगाच्या पिशवी गोणीत एकूण ४० नग ईगल हुक्का शिशा तंबाखु पॉकीट झेन टोब्याको कंपनीचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचे एकूण १२ गोणी, पोती असा एकून १४ लाख ५५ हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल आढळला आहे. हा मुद्देमाल चंद्रपूर येथील वसीम यांच्याकडून आणला असल्याचे माहिती आहे.