महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबळी संख्येचा विस्फोट, एकाच दिवशी १४ बळी - यवतमाळ कोरोना

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ही वाढती मृत्यूसंख्या पाहता प्रशासनही त्यापुढे हतबल झाल्याचे दिसत आहे. त्यातच रविवार जिल्ह्यात कोरोनाबळींच्या संख्येचा विस्फोट झाला. या एकाच दिवशी तब्बल १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

corona patients die in Yavatmal district
corona patients die in Yavatmal district

By

Published : Mar 21, 2021, 8:20 PM IST

Updated : Mar 21, 2021, 8:31 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ही वाढती मृत्यूसंख्या पाहता प्रशासनही त्यापुढे हतबल झाल्याचे दिसत आहे. त्यातच रविवार जिल्ह्यात कोरोनाबळींच्या संख्येचा विस्फोट झाला. या एकाच दिवशी तब्बल १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या वर्षभरात एकाच दिवशी इतक्या जास्त प्रमाणात कधीही मृत्यू झाले नव्हते. एका दिवसात झालेले आतापर्यंतचे हे सर्वाधिक कोरोनाचे बळी आहेत.

यवतमाळमध्ये एकाच दिवशी सर्वाधिक मृत्यूंची नोंद
४३० जण कोरानामुक्त -
आज जिल्ह्यात नव्या ३८२ कोरोना पॉझिटिव्हची भर पडली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये यवतमाळ येथील ७२, ७९, ८०, ४५, ५०, ५८, ८३ वर्षीय पुरुष आणि ६३ वर्षीय महिला, पुसद येथील ८५ वर्षीय महिला, महागाव येथील ७८ वर्षीय पुरुष, दारव्हा येथील ५१ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ४० वर्षीय महिला, केळापूर तालुक्यातील २६ वर्षीय महिला आणि माहुर (जि. नांदेड) येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या ३८२ जणांमध्ये २६७ पुरुष आणि ११५ महिला आहेत. गेल्या २४ तासात ४३० जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या २१,९९७ आहे. तर जिल्ह्यात एकूण ५६० मृत्यूची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत २३१९६८ नमुने पाठविले असून यापैकी २२०६०० प्राप्त तर ११३६८ अप्राप्त आहेत. तसेच १९६००७ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहे.
नगरसेवकाचा कोरोनाने मृत्यू -
जिल्ह्यात फोफावत असलेल्या कोरोनाने आता मृत्यूचे तांडव सुरू केले आहे. त्यात दरदिवशी मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. त्यातच शहरातील प्रभाग क्रमांक २७ चे नगर पालिका सदस्य राजु केराम यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या वेळी पार पडलेल्या पालिका सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आले होते.
स्मशानातही उरली नाही जागा -
एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे मृत्यू झाले. यासोबतच इतर मृत्यूही मोठ्या संख्येने झाले. त्यामुळे पांढरकवडा मार्गावर असलेल्या हिंदु स्मशानभुमीत मृतदेहावर अग्नीसंस्कार करण्यासाठीही जागा शिल्लक नव्हती. अखेर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी तयार करण्यात आलेल्या ओट्यांसोबतच ओट्यांच्या बाजुला खाली काही चीता रचून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Last Updated : Mar 21, 2021, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details