महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात 126 नवे कोरोनाग्रस्त तर 16 बाधितांचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यात आज 126 नवे कोरोनाग्रस्त आढळले असून एकुण बाधितांचा आकडा 7 हजार 288 इतकी झाली आहे.

कोरोना रुग्णालय
कोरोना रुग्णालय

By

Published : Sep 21, 2020, 9:52 PM IST

यवतमाळ - जिल्हात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. मागील चोवीस तासांत दिवशी 16 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर 126 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. 190 जणांनी कोणावर मात केली आहे.

आज (दि. 21 सप्टें.) मृत झालेल्या 16 जणांमध्ये यवतमाळ शहरातील सात पुरुष आणि एका महिला, यवतमाळ तालुक्यातील एकाचा समावेश आहे. वणी तालुक्यातील 58 व 47 वर्षीय पुरुष, आर्णी शहरातील 48 वर्षीय व तालुक्‍यातील 24 वर्षे पुरुष, राळेगाव शहरातील 70 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 61 वर्षीय महिला पुसद शहरातील 61 वर्षे पुरुष यांचा मृतांमध्ये समावेश आहेत.

सध्या जिल्ह्यात 586 सक्रिय रुग्ण आहेत गृह विलगीकरणात 457 जण तर संस्थात्मक विलगीकरणात 256 जण आहेत. जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 7 हजार 288 इतकी झाली आहे. त्यापैकी 6 हजार 25 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 220 मृत्यू झाले आहेत.

हेही वाचा -पांढरकवडा तालुक्यात वाघिणीची दहशत, बंदिस्त करण्याचा ग्रामस्थांनी केला ठराव

ABOUT THE AUTHOR

...view details