यवतमाळ - जिल्ह्यात 124 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे तर 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. आतापर्यंत मृत्युची एकूण संख्या 99 झाली आहे. 22 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. मृतांमध्ये यवतमाळ शहरातील 64 वर्षीय महिला, 82 वर्षीय व 67 वर्षीय पुरूष, बाभुळगाव तालुक्यातील 49 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 64 वर्षीय पुरुष, नेर शहरातील 52 वर्षीय पुरुष व वणी शहरातील 40 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ;124 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर, 22 जणांना डिस्चार्ज - यवतमाळ कोरोना अपडेट बातमी
यवतमाळ जिल्ह्यात आज 124 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 7 कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकुण बाधितांचा आकडा 3 हजार 727 पोहोचला आहे तर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 99 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
जिल्ह्यात मागील 24 तासात 124 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून त्यामध्ये 76 पुरुष व 48 महिलांचा समावेश आहे. यात दिग्रस शहरातील 45 पुरुष व 31 महिला, उमरखेड शहरातील 4 पुरूष, आर्णी शहरातील एक पुरूष व तीन महिला, आर्णी तालुक्यातील दोन पुरुष, दारव्हा शहरातील दोन पुरूष व तीन महिला, दारव्हा तालुक्यातील तीन पुरुष, पांढरकवडा शहरातील पाच, पांढरकवडा तालुक्यातील एक पुरूष, पुसद शहरातील सहा पुरुष व पाच महिला, पुसद तालुक्यातील एक पुरुष, यवतमाळ शहरातील पाच पुरूष व पाच महिला, यवतमाळ तालुक्यातील एक महिला व एक पुरूषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात 3 हजार 727 एकूण कोरोनाबाधित असून त्यापैकी 2 हजार 689 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 243 जण आहेत. तर जिल्ह्यात 99 मृत्युची नोंद आहे. सध्या 695 सक्रिय रुग्ण आहेत त्यापैकी आयसोलेशन वॉर्डात 196 जण भरती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने गुरूवारी 186 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.