महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Beef Smuggling : १२ टन गोवंश मास जप्त; पांढरकवडा पोलिसांची कारवाई - Beef seized by pandharkavda police yawatmal

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४वरुन मोठ्या प्रमाणात गो तस्करी केली जाते. ( Cow Smuggling Yawatmal ) आता तर तस्करांनी नवीन शक्कल लढवितांना गोवंश मास तस्करी शुरू केली आहे. तस्करांच्या मुसक्या आवळतांना पांढरकवडा पोलिसांनी १२ टन गोवंश मास नागपूर वरून हैदराबाद कडे घेऊन चाललेल्या एका ट्रकचा पाठलाग करून आरोपीस अटक केली.

pandharkavda police station
पांढरकवडा पोलीस ठाणे

By

Published : Feb 8, 2022, 9:54 PM IST

Updated : Feb 8, 2022, 10:32 PM IST

यवतमाळ - राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४वरुन मोठ्या प्रमाणात गो तस्करी केली जाते. ( Cow Smuggling Yawatmal ) आता तर तस्करांनी नवीन शक्कल लढवितांना गोवंश मास तस्करी शुरू केली आहे. तस्करांच्या मुसक्या आवळतांना पांढरकवडा पोलिसांनी १२ टन गोवंश मास नागपूर वरून हैदराबाद कडे घेऊन चाललेल्या एका ट्रकचा पाठलाग करून आरोपीस अटक केली.

जप्त करण्यात आलेला ट्रक

गावकऱ्यांच्या मदतीने ट्रक पकडण्यास यश -

पोलीस दिलेल्या माहितीनुसार, ट्रक (एमएच ४० बीएल ५९९१) मध्ये गोवंश मास असल्याची माहिती ठाणेदार जगदीश मंडलवार यांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी पांढरकवडा टोल टॅक्सवर सापळा रचला. मात्र, पोलीस बघताच ट्रक चालकाने ट्रक पलटून नागपूर मार्गे पळू लागला. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून उमरी येथे गावकऱ्यांच्या मदतीने ट्रक पकडण्यास यश मिळविले.

हेही वाचा -Dr. Himmatrao Bawaskar on ETV Bharat : विंचूदंशावरील औषधीची निर्मिती, हेल्दी इंडियाची व्याख्या याबाबत काय म्हणाले पद्मश्री हिम्मतराव बावस्कर?

३४ लाख ८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त -

पोलिसांनी ट्रकमधून २४ लाख रुपये किंमतीचे बैल व म्हशीचे १२ टन मास, १० लाख रुपये किमतीचा ट्रक, २ मोबाईल व रोख ३२०० रुपये असा एकूण ३४ लाख ८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक दुर्गाप्रसाद मिश्रा यांच्या फिर्यादीवरून आरोपी शहेजाद नवाब कुरेशी (वय-४२, रा. नागपूर) याच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मंडलवार यांच्या नेतृत्त्वात पांढरकवडा पोलिसांनी केली.

Last Updated : Feb 8, 2022, 10:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details