दिलासादायक...! यवतमाळातील 11 कोरोनाबाधित बरे होऊन घरी; तर 3 नव्या रुग्णांची नोंद - Yawatmal total corona patients
रविवारी सुटी देण्यात आलेल्या 11 जणांवर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलशेन वॉर्डात उपचार सुरू होते. या जिल्ह्यातील ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 33 झाली आहे.
यवतमाळ -जिल्ह्यातील 11 कोरोनाबाधितांना ते बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली. तर रविवारी 3 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली.
रविवारी सुटी देण्यात आलेल्या 11 जणांवर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलशेन वॉर्डात उपचार सुरू होते. या जिल्ह्यातील ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 33 झाली आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 157 झाले आहेत. यापैकी तब्बल 122 पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 40 जण भरती आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, विनाकारण बाहेर पडू नये, बाहेर जाताना मास्क लावूनच जावे, कुठेही गर्दी करू नये, फिजिकल डिस्टनसिंगच्या नियमाचे पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे.