महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात 104 नवीन कोरोना 'पॉझिटिव्ह' रुग्णांची भर; दोन रुग्णांचा मृत्यू

सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या ५७३ असून होम आयसोलेशनमध्ये १३१ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २ हजार ३४२ झाली आहे. यापैकी १ हजार ५७८ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

yavatmal
यवतमाळ कोरोना

By

Published : Aug 19, 2020, 3:19 AM IST

यवतमाळ - जिल्ह्यात काल (मंगळवार) नव्याने १०४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर दोन कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. मृत झालेल्यामध्ये दारव्हा येथील आठवडी बाजार परिसरातील ५५ वर्षीय पुरुष आणि पुसद येथील खतीब वॉर्डातील ४० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच २४ तासात १७५ जणांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.


पॉझिटिव्ह आलेल्या १०४ जणांमध्ये ५४ पुरुष आणि ५० महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील सेवानगर येथील एक पुरूष दोन महिला, शर्मा लेआऊट येथील एक पुरूष व दोन महिला, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील एक महिला, शारदा चौक येथील एक पुरूष, शिवनेरी सोसायटी येथील दोन महिला, शहराच्या इतर भागातील २७ पुरूष व २५ महिला, दिग्रस शहरातील १४ पुरूष व १३ महिला, गवळीपुरा दिग्रस येथील एक महिला, पुसद शहरातील तीन पुरूष, मोतीनगर येथील एक पुरूष, पुसद तालुक्यातील बेलोरा येथील एक पुरूष, कळंब येथील चार पुरूष व चार महिला, उमरखेड येथील एक पुरूष यांचा समावेश आहे.

कोरोना कक्ष


सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या ५७३ असून होम आयसोलेशनमध्ये १३१ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २ हजार ३४२ झाली आहे. यापैकी १ हजार ५७८ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ६० मृत्युंची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १४० जण भरती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details