वाशिम- जिल्ह्यातील जांभरून नावजी येथे एका तरुणाने फेसबुकवर पोस्ट टाकून आत्महत्या केली आहे. 'पप्पा आता तरी आईला समजून घ्या' अशी पोस्ट त्याने फेसबुकवर टाकली आहे.
फेसबुकवर पोस्ट टाकून वाशिममध्ये तरुणाची आत्महत्या - पोस्ट
'पप्पा आता तरी आईला समजून घ्या' अशी फेसबुकवर पोस्ट टाकून तरुणाने आत्महत्या केली आहे.
फेसबुकवर पोस्ट टाकून युवकाची आत्महत्या
शुभम भालेराव असे, या तरुणाचे नाव आहे. त्याने आपल्या फेसबुक पोस्टवर मामाबद्दल प्रेम व्यक्त केले. तर तुमची माझ्यासाठी काही करण्याची इच्छा असेल, तर माझ्या मित्राच्या लग्नाला अक्षदा टाकायला जाल, असेही त्याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.