वाशिम - भाजपा सरकारच्या धोरणांमुळे देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढल्याची टीका करत युवक काॅंग्रेसने आंदोलन छेडले आहे. त्याविरोधात युवक काँग्रेसच्या वतीने बेरोजगार युवकांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी 'रोजगार दो' अशी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर टाळ्या वाजवत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
'रोजगार दो'...युवक काँग्रेस भाजपा सरकारविरोधात आक्रमक - agitation in washim
भाजपा सरकारच्या धोरणांमुळे देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढल्याची टीका करत युवक काॅंग्रेसने आंदोलन छेडले आहे. त्याविरोधात युवक काँग्रेसच्या वतीने बेरोजगार युवकांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी 'रोजगार दो' अशी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर टाळ्या वाजवत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
केंद्र सरकारने दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्मितीचे भ्रामक आश्वासन देत सत्ता बळकावल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. रोजगार हिरावणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत व आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरवर्षी दोन कोटी रोजगार देतो म्हणणाऱ्या मोदी सरकारने रोजगार देण्याऐवजी कोट्यवधी लोकांचे रोजगार हिरावून घेतले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे 'रोजगार दो' आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्रातील भाजपा सरकार चुकीचे निर्णय घेऊन रोजगार हिरावून घेण्यापेक्षा चांगले निर्णय घेऊन रोजगार निर्मिती करावी, अशी ही मागणी आंदोलनातील युवकांनी केली आहे.