वाशिम - मंगरुळपीर तालुक्यातील हिरंगी येथील दहा वर्षे वयाच्या चिमुकल्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
10 वर्षाच्या मुलीचा बुडून मृत्यू; खाणीत पाय घसरल्याने दुर्घटना - child killed in washim
मंगरुळपीर तालुक्यातील हिरंगी येथील दहा वर्षाच्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मंगरुळपीर तालुक्यातील हिरंगी येथील दहा वर्षाच्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
हिरंगी येथील रामदास बबन भोसले यांची भाची अविना अरुण पवार गावातील बंदीमध्ये इंधनासाठी लाकूड अणण्यासाठी गेली होती. यादरम्यान पाय घसरून खाणीत पडल्याने तिचा मृत्यू झाला. गावातील एका महिलेने संबंधित मुलगी खाणीत साचलेल्या पाण्यात पाय घसरून पडल्याची माहिती दिली.
घटनास्थळी गेल्यानंतर अविनाचा बुडून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी यासंबंधी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.