वाशिम - खरीपाच्या पेरणीला लवकरच सुरुवात होणार असून शेतकऱ्यांना बियाणे व खते पुरवण्यासाठी कृषी विभागाने नियोजन सुरू केले आहे. जिल्हा परिषदचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या पुढाकारने जिल्हा प्रशासनाने बचत गटांना देखील यामध्ये सामावून घेतले आहे.
बचत गटांचा शेतकऱ्यांना हातभार; बियाणांसाठी वाशिममध्ये कार्यशाळा
खरीपाच्या पेरणीला लवकरच सुरुवात होणार असून शेतकऱ्यांना बियाणे व खते पुरवण्यासाठी कृषी विभागाने नियोजन सुरू केले आहे. जिल्हा परिषदचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या पुढाकारने जिल्हा प्रशासनाने बचत गटांना देखील यामध्ये सामावून घेतले आहे.
विविध बचत गटांच्या सात हजार महिलांना बियाणांची उगवणक्षमता तपासून त्यावर बीजप्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जाभारून महाली येथे आज बचत गटांच्या माध्यमातून बियाणे उगवणक्षमता तपासणीवर कार्यशाळा घेण्यात आली. सध्या रास्त भावात एकत्रित खत आणि बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांमार्फत शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा ध्यास घेतलेला वाशिम राज्यातील पहिला जिल्हा आहे.
कोरोनामुळे खरिपाच्या पेरण्यांसाठी रासायनिक खते व बी-बियाणे मिळण्यास कोणतीही अडचण जाऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेने संबंधित निर्णय घेतला आहे. मागील वर्षी सोयाबीन कापणीच्या हंगामात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे यंदा सोयाबीनच्या बियाणांचा तुटवडा भासणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या घरीच सोयाबीनची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. रासायनिक खतांचा पुरवठा करण्याचे काम बचतगटांना देण्यात आले आहे. यामुळे रास्तभावात शेतकऱ्यांना खत आणि बियाणे उपलब्ध होणार आहे. यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचणार असून बचतगटांना देखील आर्थिक मदत होणार आहे.