महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने परिसर सील; रेड झोनमधील महिलांचा एक तास ठिय्या - वाशिममधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या

निमजगा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने मागील काही दिवसापासून हा परिसर रेड झोन जाहीर करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे या परिसरातील महिलांनी प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन केले.

washim
आंदोलक महिला

By

Published : Jun 17, 2020, 8:23 PM IST

Updated : Jun 17, 2020, 10:58 PM IST

वाशिम- कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. वाशिम शहरातील निमजगा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हा परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना किराणासह अन्य वस्तू खरेदीसाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने परिसर सील; रेड झोनमधील महिलांचा एक तास ठिय्या

वाशिम शहरातील निमजगा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने मागील काही दिवसांपासून हा परिसर रेड झोन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना किराणासह इतर समस्या भेडसावत आहेत. येथील महिला जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपली कैफियत मांडणार होत्या. मात्र पोलिसांनी परिसर सील केल्यामुळे त्यांना जाण्यास मनाई करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास या महिलांना मनाई करण्यात आल्याने महिलांनी या परिसरातच मंगळवारी एक तास ठिय्या मांडला होता. प्रशासनाने रेड झोनमध्ये आलेल्या नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आंदोलक महिलांनी केली.

Last Updated : Jun 17, 2020, 10:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details