महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रस्ता अडवल्याने 50 एकर जमीन पेरणीविनाच, प्रश्न सोडविण्याची १३ शेतकऱ्यांची मागणी - वाशिम शेतकरी रस्ता वाद बातमी

मागील तीन वर्षापासून हा रस्ता मोकळा करण्याचा प्रश्न सुटला नसल्याने मंगरूळपीर तहसील कार्यालयाची कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळं आतातरी महसूल विभागाने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी पीडित शेतकरी करीत आहेत.

farmers blocked the road in washim
शेतकऱ्याने रस्ता अडवल्याने 50 एकर जमीन पेरणीविनाच

By

Published : Jul 5, 2020, 10:15 AM IST

Updated : Jul 5, 2020, 10:35 AM IST

वाशिम - मंगरूळपीर तालुक्यातील मसोला येथील शेतात जाण्यायेण्याचा रस्ता एका शेतकर्‍याने अडवल्यामुळे गावातील 13 शेतकऱ्यांची 50 एकर जमीन पेरणीविनाच आहे. यासंदर्भात मंगरूळपीर तहसील कार्यालयात जाऊन मागील तीन वर्षांपासून रस्ता मोकळा करून देण्यासाठी हे तेरा शेतकरी पाठपुरावा करत आहेत. मात्र, अद्याप प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे.

रस्ता अडवल्याने 50 एकर जमीन पेरणीविनाच, प्रश्न सोडविण्याची १३ शेतकऱ्यांची मागणी
सतत तीन वर्षापासून पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. शेतकऱ्यांनी न्याय मागावा तरी कोणाला असा प्रश्न पडलाय. मागील तीन वर्षापासून हा रस्ता मोकळा करण्याचा प्रश्न सुटला नसल्याने मंगरूळपीर तहसील कार्यालयाची कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळं आतातरी महसूल विभागाने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी पीडित शेतकरी करीत आहेत.
Last Updated : Jul 5, 2020, 10:35 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details