वाशिम -देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला असून १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे मागील दीड महिन्यापासून देशी दारुसह वाईन शॉप बंद होते. मात्र, वाशिम जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने मद्य विक्री सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.
वाशिम जिल्ह्यातील देशी दारूसह वाईन शॉप सुरू; तळीरामांना दिलासा - ग्रीन झोन
लॉकडाऊनमुळे मागील दीड महिन्यापासून देशी दारुसह वाईन शॉप बंद होते. मात्र, वाशिम जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने मद्य विक्री सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकान मालक आणि ग्राहकांवर कारवाई केली जाणार आहे, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
वाईन शॉप
मद्यविक्री सुरू होणार म्हणून सकाळपासूनच दारूच्या दुकानांवर गर्दी दिसून आली. सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करत तळीरामांनी दारू खरेदी केली. देशी दारूच्या दुकानाला सकाळी 8 ते 12 तर वाईन शॉप 10 ते 2 या वेळेत सशर्त दारू विक्रीचा परवाना देण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकान मालक आणि ग्राहकांवर कारवाई केली जाणार आहे, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
Last Updated : May 6, 2020, 12:54 PM IST