वाशिम -आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी युती होणे शक्य नसेल तिथे स्वबळावर लढणार असल्याचे, शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी म्हटले आहे. कार्यकर्ता मेळाव्यासाठी जिल्ह्यात आले असताना ते माध्यमांशी बोलत होते.
'युती झाली नाही तर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार'
शिवसंग्राम पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. शिवसेनेने महायुतीतून काढता पाय घेतल्यानंतर इतर घटक पक्ष कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, शिवसंग्राम पक्ष भारतीय जनता पक्षासोबत असल्याचे मेटे यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे
हेही वाचा -वाशिम: घरकुलाची रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर; तक्रारदाराचे टॉवरवर चढून आंदोलन
शिवसंग्राम पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. शिवसेनेने महायुतीतून काढता पाय घेतल्यानंतर इतर घटक पक्ष कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, शिवसंग्राम पक्ष भारतीय जनता पक्षासोबत असल्याचे मेटे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्यासोबतच, स्वबळावर लढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.