वाशिम- अमरावती-कारंजा महामार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून चालू आहे. मात्र कंत्राटदारांनी रस्त्याच्या कडेला नाल्या काढल्या नसल्याने कामरगाव येथील सुनील गावंडे यांच्या शेतात पहिल्याच पावसात पाणी साचले आहे. त्यामुळे शेताला तळ्याचे स्वरुप आले आहे. खरीप हंगामात या शेतात पेरणी करणे अवघड झाले आहे. वेळोवेळी सांगूनही कंत्राटदार रस्त्याच्या कडेला नाली काढत नसल्याने याचा फटका रस्त्या काठच्या शेतकऱ्यांना बसत आहे.
महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे शेतात साचले तळे; कंत्राटदाराच्या दिरंगाईचा शेतकऱ्याला फटका - लेटेस्ट न्यूज इन वाशिम
कंत्राटदारांनी रस्त्याच्या कडेला नाल्या काढल्या नसल्याने कामरगाव येथील सुनील गावंडे यांच्या शेतात पहिल्याच पावसात पाणी साचले आहे. त्यामुळे शेताला तळ्याचे स्वरुप आले आहे. खरीप हंगामात या शेतात पेरणी करणे अवघड झाले आहे.
ऐन पेरणीच्या दिवसात अमरावती कारंजा महामार्गामुळे शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडचणीचे कायमस्वरूपी निराकरण करावे, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. महामार्गाच्या कामामुळे नाला नसल्याने पाणी शेतात तुंबले असून शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
सध्याचा काळ हा पेरणीचा असून शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहले आहे. दरवर्षी हीच अडचण शेतकऱ्यांना राहील का असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.