वाशिम - जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार, हे निश्चित झाले होते. यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला तर उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आल्याचे दिसत आहे. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चंद्रकांत ठाकरे यांनी, तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या डॉ. शाम गाभणे यांनी आपले अर्ज दाखल केले.
हेही वाचा... 'सरकारविरूद्ध आंदोलन करताना केंद्र सरकार म्हणा कारण, राज्याचे सरकार तुमच्या सोबत आहे'
वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी 7 तारखेला झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. यात राष्ट्रवादीला 12 जागा, काँग्रेसला 09 जागा आणि शिवसेनेला 06 जागा अशा एकूण 27 जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यामुळे परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार, हे निश्चित होते. शुक्रवारी अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना, महाविकास आघाडीकडून अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रकांत ठाकरे यांनी आपला अर्ज दाखल केला. तर, उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या डॉ. शाम गाभणे यांनी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीने वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे राष्ट्रवादीला तर उपाध्यक्ष पद काँग्रेसला दिल्याचे दिसत आहे. दुसरीकडे जनविकास आघाडी आणि भाजपकडून एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची निवड बिनविरोध झाली.