वाशिम - गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण घटल्याने जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये जवळपास 50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला, तरिही रब्बी हंगामातील सिंचन घटणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
यंदाचा मान्सून संपत आल्यानंतरही जिल्ह्यातील लहान-मोठे 134 प्रकल्प कोरडेच होते. मात्र, मागील तीन दिवसात झालेल्या रिमझिम पावसामुळे तीन मध्यम तसेच 131 लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा 50 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात 50 टक्क्याहून जास्त पाणी साचल्याने स्थानिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.