वाशिम - येथील सायकलस्वार दरवर्षी सायकलवरून मुंबई येथील लालबागचा राजाच्या दर्शनाला जातात. यंदाही या युवकांनी सायकलवारीची परंपरा कायम ठेवली आहे. मंगळवारी सकाळी हे सायकलस्वार युवक मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले. यावेळी पोलीस कर्मचारी आर्यन डाखोरे व प्रशांत बक्षी यांनी सायकलवारीला हिरवा झेंडा दाखवला.
वाशिम येथील मोरया ब्लड डोनर ग्रुप व सायकल स्टुडिओच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी आयोजीत करण्यात आली आहे. वाशिम ते लालबाग या सायकलवारीची सुरुवात सकाळी ६ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून झाली.