महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिमच्या शिक्षकाने उभारली कोरोना जनजागृती गुढी

'काम बुलाता है मगर जानेका नही' असा संदेश देत, आजपासून घरात थांबणार की उद्या भविष्यात आपल्या फोटोवर हार टाकण्यास नातेवाईकांना सांगणार, असा सवाल गुढीच्या माध्यमातून एका शिक्षकाने केला आहे.

corona campaign
वाशिमच्या शिक्षकाने उभारली कोरोना जनजागृती गुढी

By

Published : Mar 25, 2020, 9:50 PM IST

वाशिम -कारंजा येथील रहिवासी आणि जिल्हा परिषद शाळा, कामरगावचे उपक्रमशिल शिक्षक गोपाल खाडेंनी आपल्या निवास्थानी कोरोना जनजागृती गुढी उभारली. स्वच्छ भारत मिशन, लेक वाचवा, मतदान जागृतीसाठी रोबोट कच्छी घोडी आणि पथनाट्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत मांडल्या. सध्या जगभरात कोरोना हा विषाणू थैमान घालत आहे.

वाशिमच्या शिक्षकाने उभारली कोरोना जनजागृती गुढी

शासन स्तरावरून कोरोना विषाणू संदर्भात खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. खाडे परिवाराने सुद्धा आपल्या परीने गुढिपाडव्याच्या दिवशी कोरोना संदर्भात जागृती व्हावी म्हणून, अभिनव गुढी उभारली. या गुढीच्या माध्यमातून वारंवार हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा, घराबाहेर पडू नका. कोरोनाविरुधातील लढाई ही घरात राहूनच जिंकता येईल, असा संदेश गुढिद्वारे दिला. 'काम बुलाता है मगर जानेका नही' असा संदेशही दिला. आजपासून घरात थांबणार की उद्या भविष्यात आपल्या फोटोवर हार टाकण्यास नातेवाईकांना सांगणार, असा सवाल गुढीच्या माध्यातुन केला.

वाशिमच्या शिक्षकाने उभारली कोरोना जनजागृती गुढी

ABOUT THE AUTHOR

...view details