वाशिम -कोरोनामुळे सध्या सगळीकडे लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊन दरम्यान अनेक नागरिकांना क्वारंटाईन देखील करण्यात आले आहे. वाशिमच्या कारंजामध्ये क्वारंटाईन केलेल्या नागरिकांसाठी तुळजाभवानी मंगल कार्यालयामध्ये निवासाची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी या नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे, यासाठी सात दिवसांच्या योगा क्लासचे आयोजन करण्यात आले आहे.
'क्वारंटाईन' केलेल्या नागरिकांच्या तंदुरुस्तीसाठी सात दिवसांचा योगा क्लास
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था, वसुंधरा टीमच्या वतीने या क्लासचे आयोजन करण्यात आले आहे. कारंजा येथील तुळजाभवानी मंगल कार्यालयामध्ये जिल्ह्यातील आणि बाहेर राज्यातील काही नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी या क्लासचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा...ट्रक चालकाची कैफियत ऐकून ऑनलाईन चोराला फुटला पाझर; चोरीची अर्धी रक्कम केली परत!
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था, वसुंधरा टीमच्या वतीने या क्लासचे आयोजन करण्यात आले आहे. कारंजा येथील तुळजाभवानी मंगल कार्यालयामध्ये जिल्ह्यातील आणि बाहेर राज्यातील काही नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांचे आरोग्य निरोगी राहावे, म्हणून सात दिवसांचा योगा क्लास घेण्यात आला आहे. संस्थेच्या अर्चना कदम आणि निशा खुमकर यांनी या नागरिकांना विनामूल्य सात दिवस योगा शिकवला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तेथील सर्व उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांची एक आठवण म्हणून एक झाड लावण्यात आले आहे.