महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस दाम्पत्याने जपली 'माणुसकी'; मुलाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून 30 कुटुंबीयांना केले अन्नधान्य वाटप - WASHIM POLICE HELPING WORKER

वाशिम पोलीस दलातील शिरसाठ या पोलीस दाम्पत्याने आपल्या मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून 30 मजुरांच्या कुटुंबीयांना अन्नधान्य वाटप केले.

WASHIM POLICE COUPLE
पोलीस दाम्पत्याने जपली 'माणुसकी'; मुलाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून 30 कुटुंबीयांना केले अन्नधान्य वाटप

By

Published : Apr 8, 2020, 8:44 PM IST

वाशिम - देशातील सर्वच घटकांना कोरोना विषाणूचा फटका बसू लागला असला, तरी सर्वाधिक दयनीय अवस्था कामगारांची झाली आहे. या वर्गात मोडणाऱ्या आणि हातावर पोट असलेल्या लोकांवर करोनामुळे अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे. याच बाबीचा विचार करून वाशिम पोलीस दलातील शिरसाठ या पोलीस दाम्पत्याने आपल्या मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून 30 मजुरांच्या कुटुंबीयांना अन्नधान्य वाटप केले.

पोलीस दाम्पत्याने जपली 'माणुसकी'; मुलाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून 30 कुटुंबीयांना केले अन्नधान्य वाटप
वाशिम शहरातील 30 मजुरांना लॉकडाऊन काळात अन्नधान्य देण्याचे काम शिरसाठ पोलीस दाम्पत्यांनी केले आहे. या कसोटीच्या काळात या दाम्पत्यांनी जपलेला मानवतेचा हा दृष्टिकोन कौतुक करण्यासारखा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details