महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यातील पावसात यंदा 26 टक्के घट; नागरिक दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

वाशिम जिल्ह्यात मागच्या वर्षी यावेळेस 511.73 मिमी पाऊस होता. तर, या वर्षी आत्तापर्यंत 370 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे, वाशिम जिल्ह्यातील 134 पैकी 100 प्रकल्प कोरडे ठाण असून वाशिम जिल्हा दमदार पावसाच्या प्रतेक्षेत आहे.

वाशीम

By

Published : Aug 4, 2019, 10:15 AM IST

वाशिम - जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून अधून मधून सर्वदूर रिमझिम संततधार पाऊस सुरू आहे. मात्र आयएमडीच्या अहवालानुसार वाशिम जिल्ह्याच्या पावसात यावर्षी घट झाली असून 26 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाशिम जिल्ह्याच्या पावसात यंदा घट


वाशिम जिल्ह्यात मागच्या वर्षी यावेळेस 511.73 मिमी पाऊस होता. तर, या वर्षी आत्तापर्यंत 370 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे, वाशिम जिल्ह्यातील 134 पैकी 100 प्रकल्प कोरडे ठाण असून वाशिम जिल्हा दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.


जिल्ह्यात रिमझिम पावस झाला असून, या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना संजीवनी मिळाली आहे. मात्र, रब्बी पिकांकरिता हा पाऊस चिंतेचा विषय आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडे ठाण असल्याने जिल्हावासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल यामुळे चिंतेत असलेल्या नागरिक व शेतकऱ्यांना येणाऱ्या काही दिवसात जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details