वाशिम -जिल्ह्यातील स्व. पुंडलिकराव गवळी महाविद्यालयात पर्यावरणपूरक गणपती अभियान राबविण्यात आले. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभाग व इको क्लबद्वारे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
वाशिममध्ये स्व. पुंडलिकराव गवळी महाविद्यालयात पर्यावरणपूरक गणपती अभियान - वाशिम
“चला बनवू पर्यावरणपूरक मातीचे गणपती”... वाशिम जिल्ह्यातील स्व. पुंडलिकराव गवळी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग आणि इको क्लब यांच्याद्वारे पर्यावरणपूरक गणपती अभियान राबवण्यात आले.
पर्यावरणाला हानिकारक अशा प्लास्टर ऑफ पॅरीसचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग व इको क्लबद्वारे पर्यावरणपूरक गणपती अभियान मागील सलग चार वर्षांपासून राबविले जात आहे. या वर्षीही “चला बनवू पर्यावरणपूरक मातीचे गणपती” या एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेमध्ये 200 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सुंदर व आकर्षक शाडूच्या मातीचे गणपती बनवले. गणेश मूर्तिकार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर गणेश मुर्ती बनवल्या. या सर्व गणेश मुर्तींचे प्रदर्शन बुधवार 28 ऑगस्ट 2019 रोजी महाविद्यालयात करण्यात येणार आहे. या प्रदर्शनातील मुर्तींचे परीक्षकांद्वारे परीक्षण करून उत्कृष्ठ गणेश मुर्तींची निवड करून त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सन्मान केला जाणार आहे.