वाशीम -जिल्ह्यातील मालेगाव येथील अकोला फाटा परिसरातील अयुब खान यांच्या घरात 7 फुटाचा धामण साप आढळून आला होता. याची माहिती सर्पमित्र शिवाजी बळी यांना मिळाली असता, त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या सापाला पकडले.
वाशिममध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून सापाचे रक्षण करणारा अवलिया - washim news
जिल्ह्यातील मालेगाव तालुका येथील अकोला फाटा परिसरातील सर्पमित्र शिवाजी बळी यांची ओळख परिसरात स्वतःचा जीव धोक्यात घालून सापाचे रक्षण करणारा अवलिया अशी आहे.
वाशिममध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून सापाचे रक्षण करणारा अवलिया
अकोला फाटा येथील आयुब खान यांच्या घरात शुक्रवारी अचानक साप असल्याचे घरातील महिलांना दिसून आले. यानंतर परिसरातील नागरिक या ठिकाणी गोळा झाले. हा साप आकाराने खूप मोठा असल्याने कोणीच त्याला पकडण्याचे धाडस केले नाही. नंतर याची माहिती सर्पमित्र शिवाजी बळी यांना देण्यात आली. शिवाजी बळी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या सापाला पकडले. यानंतर त्यांनी त्या सापाला सुरक्षीत ठिकाणी सोडूनही दिले.