वाशिम - अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सासऱ्याची सुनेच्या प्रियकरानेच गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वाशिम जिल्ह्यातील धार पिपरी येथे समोर आला आहे. विश्वनाथ नारायण सोनुने (वय ६५) असे मृत सासऱ्याचे नाव आहे. तर महादेव चव्हाण (वय२५) असे आरोपीचे नाव आहे.
मालेगाव तालुक्यातील धार पिपरी येथे विश्वनाथ नारायण सोनुने हे मोकळ्या जागेत मृतावस्थेत आढळले होते. पोलीस तपासातून घटनास्थळी पंचनामा आणि शवविच्छेदन अहवालातून त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले होते.
विश्वनाथ सोनुने यांच्या सुनेशी महादेवचे अनैतिक संबध होते. यावरून महादेव आणि विश्वनाथ यांचे सतत वाद व्हायचे. याचा राग मनात धरून महादेवने विश्वनाथ यांची गळा दाबून हत्या केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी महादेव चव्हाण यास अटक करून कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अनैतिक संबधात अडथळा ठरणाऱ्या सासऱ्याची सुनेच्या प्रियकराकडून हत्या
यानुसार ठाणेदार आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम सरोदे आणि त्यांच्या पथकाने तपास गतीने फिरवून घटनेच्या बारा तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक राम सरोदे करत आहेत.