वाशिम-भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. पश्चिम विदर्भातील चारही जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण वाढतच आहेत. मात्र, वाशिम जिल्हा प्रशासनाने केलेल्या काटेकोर अंमलबजावणीमुळे जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.
वाशिम जिल्हा झाला कोरोनामुक्त; जिल्ह्यात एकही अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण नाही - वाशिम कोरोना केसेस
वाशिम जिल्ह्यातील 9 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. यापैकी 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 7 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात एकही अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण नाही ही वाशिमकरांसाठी दिलासादायक बातमी आहे.
वाशिम जिल्हा झाला कोरोनामुक्त
जिल्ह्यात आजपर्यंत 9 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते. मात्र, यापैकी दोघांचा मृत्यू झाला. 7 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात एकही अॅक्टिव्ह रुग्ण नाही.
वाशिम जिल्ह्यात अजूनही परजिल्ह्यातून मजूर येत आहेत. त्यामुळे अजून धोका टळलेला नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी केले आहे.