वाशिम -वाशिमवरून हिंगोलीकडे जाणाऱ्या रस्त्याला रेल्वे गेट परिसरामध्ये तलावाचे स्वरूप आले आहे. मागील दोन वर्षांपासून सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम कधी पूर्ण होईल, अशी जनमानसात चर्चा होत आहे. रेल्वे गेटपासून दोन ते तीन किमी अंतरावर एमआयडीसी असून तेथे काम करणाऱ्या नागरिकांना व येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना या तलावामधून ये-जा करावी लागते.
वाशिम-हिंगोली रस्त्याला आले तलावाचे स्वरूप - वाशिम-हिंगोली रस्त्याबद्दल बातमी
वाशिम-हिंगोली रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. एमआयडीसीत काम करणाऱ्या नागरिकांना व येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना या रस्त्यावरुन ये-जा करावी लागते.
वाशिम-हिंगोली या रस्त्याला आले तलावाचे स्वरूप
लोकप्रतिनिधींचे सुद्धा दुर्लक्ष -
कित्येक वेळा दूधवाले या साचलेल्या पाण्यामध्ये तोल जाऊन पडले सुद्धा आहेत. पावसाळा पूर्णतः अजून सुरू झाला नाही आहे. मात्र, येथे रस्त्याची फार बिकट अवस्था झाल्याचे दिसत आहे. याकडे संबंधी प्रशासन दुर्लक्ष करत आहे. मात्र, वाशिम येथील लोकप्रतिनिधीसुद्धा याकडे दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. कंत्राटदार आणि आळशी प्रशासनामुळे संबंधित रस्त्याची दुरवस्था झाली असून त्या रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे.