वाशिम -जिल्ह्यात 3 एप्रिलला पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली होती. मात्र, त्यानंतर जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी केलेल्या नियोजनबद्ध लॉकडाऊनमुळे जिल्हा अखेर कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे राज्यात वाशिम पॅटर्न राबविण्याची गरज आहे.
वाशिम जिल्हा झाला कोरोनामुक्त... जिल्हा प्रशासनाचे यश
वाशिम जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने अंमलबजावणी केल्यामुळे वाशिम जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यातील एकमेव असलेला कोरोना बाधित रुग्ण बरा झाला आहे.
जिल्हा प्रशासनाने केलेल्या काटेकोर पणे अंमलबजावणीमुळं वाशिम जिल्हा झाला कोरोनामुक्त
वाशिम जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने कडेकोट जिल्ह्यातील सीमा बंद केल्यामुळे महानगरातून येणाऱ्या नागरिकांना तिथेच थांबविता आले. त्यामुळे आज आपल्याला जिल्हा कोरोनामुक्त करण्यात यश आले आहे. मात्र, जिल्ह्यातील एकमेव असलेला कोरोनाबाधित रुग्ण बरा झाला असला तरी आपण आता जसे नियोजन आहे. त्याच पद्धतीने लॉकडाऊन सुरूच राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी दिली आहे.