वाशिम- गृह विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या व्यक्तींनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांची रवानगी संस्थात्मक विलगीकरण कक्षात करण्याचे तसेच कोविड विषाणू तपासणीस नकार दिल्यास अशा नागरिकांवर साथरोग अधिनियम १८९७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले आहेत.
गृह विलगीकरणाचे नियम न पाळल्यास तुमची संस्थात्मक विलगीकरणात होईल रवानगी..! - कोरोना नियम पाळण्याचे वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
लक्षणे असणाऱ्या कोविडबाधितांना व गृह विलगीकरण नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. रुग्णांची परिस्थिती पाहून आरोग्य विभागाने रुग्णाला संस्थात्मक विलगीकरण म्हणजे कोविड केअर सेंटर अथवा कोविड केअर रुग्णालय किंवा स्वंतत्र कोरोना रुग्णालय यापैकी एका संस्थेमध्ये ठेवण्यात येणार आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याकरिता लक्षणे असलेल्या व्यक्ती तसेच कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती व जास्त जोखीम असलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी केली जात आहे. या तपासणीला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोना तपासणीस नकार दिल्यास अशा नागरिकांवर साथरोग अधिनियम १८९७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. पोलिसांनी तपासणी पथकाला आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.