वाशिम- कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत म्हणून केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री जनधन योजनेच्या महिला खातेधारकांच्या खात्यात प्रत्येकी पाचशे रुपये रक्कम जमा करण्यात येत आहे. बँक खात्याच्या शेवटच्या अंकानुसार तयार करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार टप्प्या-टप्प्याने हे पैसे जमा होणार असून नागरिकांनी एकाच दिवशी बँकेमध्ये गर्दी करू नये. तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या खातेधारकांनी खात्यातील रक्कम काढण्यासाठी टपाल विभागाच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे एप्रिल, मे व जून महिन्यात जनधन योजनेचे खाते असलेल्या महिलांच्या खात्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येकी पाचशे रुपये जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार बँक खात्याचा शेवटचा अंक ०,१,२,३ असलेल्या खात्यांतून ४ एप्रिल रोजी पैसे काढता येतील. बँक खात्याच्या शेवटचा अंक ४ व ५ असलेल्या खात्यात ७ एप्रिल रोजी, शेवटी ६ व ७ अंक असलेल्या बँक खात्यात ८ एप्रिल रोजी आणि ज्या बँक खात्याच्या शेवटी ८ व ९ अंक आहेत, अशा बँक खात्यात ९ एप्रिल रोजी पैसे जमा होणार आहेत. पैसे जमा झालेल्या दिवशी अथवा ९ एप्रिल २०२० नंतर केव्हाही खातेधारकाला हे पैसे काढत येतील, त्यामुळे खातेधारकांनी एकाच दिवशी बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
वाशिम जिल्ह्यातील १६४ टपाल कार्यालयात पैसे काढण्याची सुविधा-