महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

वाशिम जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात १६ अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता ४४ उमेदवार निश्चित झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

By

Published : Oct 8, 2019, 3:04 AM IST

वाशिम ­-उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात १६ अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता ४४ उमेदवार निश्चित झाले आहेत. रिसोड मतदारसंघातून १६, वाशिम मतदारसंघातून १३ आणि कारंजा विधानसभा मतदारसंघातून १५ उमेदवारांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सांगितले


रिसोड मतदारसंघात सर्वाधिक १६ उमेदवार निवडणूक लढवणार असल्याने याठिकाणी दोन बॅलेट युनिट(बीयु)ची आवश्यकता आहे. उर्वरित दोन्ही मतदारसंघांमध्ये एकाच बॅलेट युनिटवर मतदान घेतले जाणार आहे. सर्व मतदारसंघांसाठी यापूर्वीच मतदान यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. रिसोड मतदारसंघासाठी लागणारे अतिरिक्त बॅलेट युनिट जिल्ह्यात उपलब्ध आहे. लवकरच बॅलेट युनिटचे वितरण करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

हेही वाचा - नागपूर : चोरीच्या संशयातून जमावाने केली मनोरुग्णाला मारहाण


वाशिम जिल्ह्यात १०५२ मतदान केंद्रे असून या सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात १ आदर्श मतदान केंद्र व २ सखी मतदान केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. १०५ मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाईव्ह वेब कास्टिंग होणार आहे, तसेच ७० पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक नेमले जाणार आहेत.
मतदार जागृतीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा विविध उपक्रम राबवत आहे. या निवडणुकीत दिव्यांगांचे १०० टक्के मतदान होईल, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी वाशिम जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी मोडक यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details