वाशिम- जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मंगळवारी रात्री ११ वाजता मृत्यू झाला. सदर व्यक्तीला मधुमेह हा अतिजोखमीचा आजार होता.
वाशिममध्ये ६५ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू - washim corona cases
वाशिममधील कोरोनाबधित रुग्णांची संख्या 8 वर पोहोचली असून 2 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई येथून आलेल्या कोरोनाबाधित महिलेसोबत प्रवास केलेल्या ५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते. यापैकी ६५ वर्षीय व्यक्तीला गेल्या चार दिवसांपासून कृत्रिमरित्या ऑक्सिजन देवून डॉक्टरांचे पथक उपचार करीत होते. मात्र, मंगळवारी रात्री त्याची प्रकृती बिघडली.रात्री ११ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8 वर पोहोचली असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झालाय तर दोघांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. 4 रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.