वाशिम- जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून ५० हजार मेट्रिक टन खतांची मागणी नोंदवली असून त्यापैकी ४९ हजार ४१९ मेट्रिक टन खत मंजूर झाले. तर १० हजार १०९ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे.
खरीप हंगामासाठी ५० हजार मेट्रिक टन खताची कृषी विभागाची मागणी
ऐन पेरणीच्या हंगामात खासगी कृषी केंद्रांकडून कृत्रिम खत टंचाई निर्माण केली जाते. अशावेळी शेतकऱ्यांना वेठीस धरल्या जाते. खतांचे दर वाढतात. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू नये म्हणून अतिरिक्त १० टन खतांची मागणी करण्यात आली आहे.
खरीप हंगामासाठी ५० हजार मेट्रिक टन खताची कृषी विभागाची मागणी
यावर्षी कृषी विभागाने ४ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दीष्ट ठेवले आहे. या हंगामासाठी जिल्ह्यात सरासरी ४० हजार ५७० मेट्रिक खतांची गरज असताना कृत्रीम खत टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून यंदा कृषी विभागाने ५० हजार मेट्रिक टन खतांची मागणी केली आहे.