वाशिम -जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पोलिसांना देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 208 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 20 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान सध्या कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी 70 जणांवर उपचार सुरू असून, एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 208 पोलिसांना कोरोनाची लागण कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या 208 वर
सर्वसामान्य नागरिकांसोबतच प्रशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी देखील लक्षणे दिसत नसली तरी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्यांचे प्रमाण जिल्ह्यात वाढवण्यात आले आहे. त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत 208 कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली आहे. यातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या 70 जणांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा -बीड जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून दहा दिवस लॉकडाऊन