वाशिम- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनातर्फे वारंवार दिल्या जात आहेत. मात्र, या सुचनांकडे दुर्लक्ष करत नागरिक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. सोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचाही फज्जा उडत असल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात दिसून येत आहे.
वाशिममध्ये बँकांबाहेर नागरिकांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
जिल्हा प्रशासनाने बँकांमध्ये होणारी गर्दी पाहता बँकेच्या कामकाजाच्या वेळा वाढवून दिल्या आहेत. मात्र, सध्या राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट सुरू आहे. अशात लोक सकाळच्या वेळीच घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे, वाशिम जिल्ह्यात बँकांसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
वाशिममध्ये बँकांबाहेर नागरिकांची गर्दी
जिल्हा प्रशासनाने बँकांमध्ये होणारी गर्दी पाहता बँकेच्या कामकाजाच्या वेळा वाढवून दिल्या आहेत. मात्र, सध्या राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट सुरू आहे. अशात लोक सकाळच्या वेळीच घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे, वाशिम जिल्ह्यात बँकांसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून यामुळे सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.