वाशिम - जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त गावात जिल्हा प्रशासनाने टँकरची सोय केली आहे. वाशिम तालुक्यातील वांगी गावात प्रशासनाच्या वतीने आठवड्यापूर्वी टँकर मंजूर केले, मात्र अद्यापपर्यंत टँकरचा पत्ताच नाही. पाण्यासाठी गावातील महिला आक्रमक झाल्या आहेत. गावात टँकर आले नाही तर तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढणार असल्याचे महिलांनी सांगितले.
शासनाकडून टँकर मंजूर होऊनही अद्याप गावकरी टँकरच्या प्रतिक्षेत - tanker
वाशिम तालुक्यातील वांगी गावात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे ग्राम पंचायतने तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करून टँकरची मागणी केली. प्रशासनाने मागणी कागदोपत्री पूर्ण करून टँकर सुरू झाल्याचे सांगितले.
वाशिम जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने टंचाईग्रस्त ४८ गावात टँकर चालू केले असल्याची माहिती दिली. वाशिम तालुक्यातील वांगी गावात ग्राम पंचायतने टँकरची मागणी केली. जिल्हा प्रशासनाने मागणी मंजूर करून आठवडा उलटला मात्र, अद्याप टँकर पोहोचलेलाच नाही.
वाशिम तालुक्यातील वांगी गावात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे ग्राम पंचायतने तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करून टँकरची मागणी केली. प्रशासनाने मागणी कागदोपत्री पूर्ण करून टँकर सुरू झाल्याचे सांगितले. मात्र, गेल्या ३ दिवसांपासून महिला रिकामे भांडे घेऊन टँकरची वाट पाहत आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी शासनाकडून मोठा गाजावाजा करत टँकर सुरु असल्याची माहिती दिली जात आहे. मात्र, टंचाईग्रस्त गावात मंजूर होऊनही अजून टँकरच न पोहचल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर येत आहे.